चाळीसगाव। रात्रीच्या पायरी वरून पडल्याने गंभीर दुखापत झालेल्या तालुक्यातील पातोंडा येथील 75 वर्षीय वृद्ध महिलेचा नाशिक येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असतांना 25 रोजी ा मृत्यू झाला आहे.
चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला अकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार तालुक्यातील पातोंडा येथील भागाबाई चिंधा माळी (वय -75) या राहत्या घरी ओट्यावरून पडल्याने त्यांना हातापायाला व छातीला जबर मार लागला होता. प्रकृती खालावल्याने पुढील उपचारासाठी त्यांना स नाशिक येथे हलवण्यात आले होते. सहायक फौजदार ए.एफ. अहिरे यांच्या खबरीवरुन ढील तपास हवालदार धर्मराज पाटील करीत आहे.