अमळनेर। तालुक्यातील पातोंडा परीसर विकास मंचतर्फे येथील जि.प. मराठी मुलांच्या व मुलींच्या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीच्या राजा पाटया, फुटबॉल व क्रिकेट साहीत्याचे मोफत वाटप करण्यात आले. सदर साहीत्याचे वाटप नांद्री व दापोरी येथील जि.प. शाळांमधे देखील सदर साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. सदर साहीत्यासाठी कन्हैयालाल थोरात, कपील पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
यावर्षी विकास मंचतर्फे शाळा आवाराला जाळीचे कुंपण देखील करण्यात आले. त्यास गावातील ग्रामस्थ जगन्नाथ संदानशिव यांचे सहकार्य लाभले. यावेळी सरपंच शितल पवार, ग्रामपंचायत सदस्य सोपान लोहार, सागर मोरे, शालेय समिती अध्यक्ष किशोर पाटील, भगवान पाटील तसेच उपाध्यक्ष अमोल चौधरी तसेच विकास मंचचे सदस्य विलास चव्हाण, भुषण बिरारी, महेंद्र पाटील आदी उपस्थित होते.