अमळनेर। तालुक्यातील पातोंडा येथील एका 55 वर्षीय महिलेचा औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रमिला मालजी पाटील (वय -55) महिलेचा औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दहा दिवसापुर्वी चोपडा येथील डॉ.शरद पाटील यांनी स्वाईन फ्लू संशयीत रुग्ण म्हणून उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले होते. तेथे स्वाईन फ्लूची तपासणी पॉझीटीव निघाली.
जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.पोटोडे यांना सदर घटनेची कल्पना दिली असता त्यांनी पातोंडा आरोग्य केंद्राला भेट देउन वैद्यकीय अधिकारी यांना गावात सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. तसेच पातोंडा व परीसरात स्वाईन फ्लूचे जिवाणू असून ग्रामस्थांनी दक्षता पाळण्याची आवश्यकता आहे. तसेच ज्या रूग्णांना सर्दी, ताप असेल त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.