ओव्हल : भारतीय महिला संघाने आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील ‘अ’ गटातील लढतीत पहिल्याच लढतीत यजमान श्रीलंकेवर ११४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. १९ वर्षीय देविका वैद्य (८९), दिप्ती शर्मा (५४) आणि कर्णधार मिताली राज (नाबाद ७०) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने ५० षटकांत ४ बाद २५९ धावांचा डोंगर उभा केला. या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला ५० षटकांत ८ बाद १४५ धावाच करता आल्या. दुसराच एकदिवसीय सामना खेळणाऱ्या देविकाला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
देविका वैद्यच्या ८९ धावांची खेळी
महाराष्ट्राच्या देविका वैद्यच्या ८९ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा ११५ धावांनी धुव्वा उडवला. श्रीलंकेतल्या कोलंबोत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले असून, भारत आणि श्रीलंका संघांमधला सामना सारा ओव्हल मैदानावर खेळवण्यात आला. या सामन्यात देविका वैद्यनं दीप्ती शर्माच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी १२३ धावांची आणि मिताली राजच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी रचली. देविका वैद्य ही मूळची पुण्यातील असून, महाराष्ट्रातील अनेक क्रिकेट सामन्यांमध्ये तिने दमदार खेळी केली आहे. २०१४-२०१५ च्या ‘एम ए चिदंबरम ट्रॉफी फॉर बेस्ट वुमन ज्युनियर क्रिकेटर’नेही देविकाचा गौरव झाला आहे.