मुक्ताईनगरात शिवसेना महिला आघाडीला प्रशासनाला अल्टीमेटम
मुक्ताईनगर– शहरातील स्वस्त प्राधान्य दुकानांच्या गलथान कारभारामुळे पात्र असलेल्या लाभार्थी कुटुंबांना धान्याचा लाभ मिळत नाही तसेच मयत व बाहेर गावी राहत असलेल्या लाभार्थींच्या नावाने धान्या वाटप होत असल्याच्या भोंगळ कारभार तत्काळ थांबवून पात्र लाभार्थींना यादीत समाविष्ट न केल्यास शिवसेना महिला आघाडी मुक्ताईनगरतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या मुजोर कारभारामुळे शिधापत्रिकेवर पात्र कुटुंबांना धान्याचा लाभ लाभापासून वंचित रहावे लागत आहे. त्यांना धान्य मिळत नसल्याने व मयत तसेच बाहेरगावी राहत असलेल्या लाभार्थींच्या नावे धान्य वाटप होत असल्याने या भोंगळ कारभाराकडे वरीष्ठ अधिकार्यांनी लक्ष घालून तसेच कारभाराची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कार्यवाही व्हावी व शहरातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांचेकडील युनिट रजिस्टरच्या नकला देण्याचे आदेश व्हावेत व पात्र लाभार्थींना तत्काळ या योजनेत समावेश करून योजनेचा लाभ मिळावा यासह अन्य मागण्यांबाबत निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
** यांची होती उपस्थिती
निवेदन देतेवेळी कल्पना पालवे, शोभा कोळी, सरीता कोळी, यशोदा माळी, उज्ज्वला कुंभार, शारदा भोई, सुनीता तळेले, उषा पाटील, विद्या तळेले, सारीका चव्हाण, योगीता पाटील, भारती हिवराळे, विजया इंगळे, मंगला वंजारी, सुलोचना पवारसह महिला आघाडी सैनिक उपस्थित होत्या.