पाथरीत युवतीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

0

जळगाव । तालुक्यातील पाथरी येथे 19 वर्षीय युवतीने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, शेतमालकाच्या भावाने तिच्यावर अतिप्रसंग केल्याने बदनामीच्या तसेच वडीलांना माहिती पडेल या भितीपोठी युवतीने आत्महत्या केल्याचा आरोप युवतीच्या कुटूंबियांनी केला आहे. सायंकाळी जिल्हा सामान्य रूग्णालयात युवतीचा मृतदेह आणण्यात आला होता. यावेळी कुटूंबियांकडून एकच आक्रोश करण्यात आला.

मयत युवतीच्या कुटूंबियांनी दिलेली माहिती अशी की, पाथरी येथे शेतात मध्यप्रदेशातील एक कुटूंब शेतात गेल्या चार वर्षांपासून सालदारकी म्हणून कामाला आहेत. दरम्यान, बुधवारी दुपारी अचानक कुटूंबातील 19 वर्षीय युवतीने विहिरीकडे धाव घेत त्यात उडी घेतली. तिला वाचविण्यासाठी मोठ्या भावाने प्रयत्न केला. मात्र, तिचा बुडून मृत्यू झाला. अखेर सायंकाळी युवतीचा मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल झाले होते. यातच मंगळवारी रात्री पाथरी येथे जत्रा सुरू असल्याने युवतीही तिच्या वहिणीसोबत घरी एकटी होती व भाऊ बाहेर तमाशा पाहण्यासाठी गेला होता. रात्री 11 वाजेच्या सुमारास तमाशा पाहून घरी आल्यानंतर मोठ्या भावाने बहिणीवर शेतमालकाच्या भाऊ हा अतिप्रसंग करीत असल्याचे पाहिले. मात्र, भितीपोठी त्याने काहीही न करता सकाळी वडीलांना फोन करून बोलवून घेतले. मात्र, बदनामी होईल तसेच वडीलांना माहिती पडले या भितीने मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप मयत युवतीच्या वडीलांनी व भावाने केला आहे.