पाथर्जे येथे घरातून 65 हजाराचा मुद्देमाल लंपास

0

चाळीसगाव- घरात कोणी नसल्याचा फायदा घेवुन मागच्या दरवाजाने घरात घुसुन घरातील 25 हजार रुपये रोख सोन्या चांदीचे दागिने असा 65 हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने 11 ऑक्टोबर रोजी रात्री 9 ते 11-30 वाजेच्या दरम्यान लंपास केला होता. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथर्जे येथील भिमराव नथु जाधव (42) यांच्या चुलत भावाच्या मुलीच्या हळदीच्या कार्यक्रमाला गावातच कुटुंबासह 11 रोजी रात्री 9 वाजता गेले होते.

कार्यक्रम आटोपुन रात्री 11-30 वाजता घरी परतले तेव्हा त्यांना घराचा मागचा दरवाजा उघडा दिसला त्यांना संशय आल्याने त्यांनी घरात पाहीले असता अज्ञात चोरट्याने घरात ठेवलेल्या पेटीतील 25 हजार रुपये रोख, 15 हजार रुपये किमतीची 5 ग्रॅम सोन्याची अंगठी, 20 हजार 500 रुपये किमतीचे 50 भार चांदीचे वेले, 4 हजाराचे ल्युमिनियमचे 3 पातेले व 500 रुपये किमतीचा स्टीलचा हंडा असा एकुण 65 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. त्यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार किशोर सोनवणे करीत आहेत.