जळगाव । तालुक्यातील पाथर्डी येथे गॅस गळतीमुळे आग लागून किरणादुकान चालकाचे घरी जळून खाक झाल्याची घटना घडली. सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास महिला स्वयंपाकाला सुरवात करतांनाच गॅसवर आगिचा भडका उडाला. या महिला घाबरून घरातून बाहेर पडली. काही सेकंदातच संपुर्ण घरात आगीचे लोट उठून घरातील संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले. गावकर्यांनी मदतीला धाव घेतल्यानंतर काही तासानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात यश आहे.
मुलीला घेवून आईची घराबाहेर धाव…
जळगाव तालूक्यातील म्हसावद जवळील पाथर्डी गावात प्रकाश अनंदा सोनवणे (वय-32) कुटूंबासह वास्तव्यास आहे. आज सकाळी नेहमी प्रमाणे प्रकाश सोनवणे दुकानावर गेले होते. तर मुलगा यश (वय-10) शाळेत गेला होता. घरात पत्नी पुनम आठवर्षीय मुलगी संजीवनी सोबत होती. पुनम ह्या सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास स्वयंपाकाची तयारी करत असतांना गॅस सुरु करताच भडका उडला. अचानक आग लागल्याचे पाहुन पुनम यांनी मुलीला घेवुन घराबाहेर धाव घेतली. मदतीला आरडा-ओरड केल्यावर शेजार्यांसह गावकर्यांनी आग लागलेल्या घराकडे धाव घेतली. त्यानंतर जोरदार पाण्याचा मारा सुरू केला. प्रकाश सोनवणे यांना घटना कळाल्यावर त्यांनी घराकडे धाव घेतली. दिडतासानंतर आग विझवण्यात यश आले. सोनवणे यांच्या खबर वरुन औद्योगीक वसाहत पोलिसांत अकस्मीक आगीची नोंद करण्यात आली आहे.
अडीच लाखांचे नुकसान
प्रकाश सोनवणे यांच्या घरात गॅस गळतीने आग लागल्यानंतर टिव्ही,कुलर, अंथ्रृण पांघृणासहीत अन्न धान्य, कपडे व इतर सर्व साहित्य आगीत जळून खाक झाले आहे. घरखर्चातून बचत करुन गोळा केलेले पन्नास हजार रुपये प्लॅस्टीकच्या डब्यासह आगीत सापडल्याने नोटा अर्धवट जळाल्या आहेत. गॅसगळतीने घरातील इतर साहित्य जळत असतांना विद्युतपुरवठा सुरु असलेल्या फ्रिज जवळ आग पोचल्याने क्रॉम्प्रेसरचा स्फोट होवुन आगीने रौद्र रुप धारण केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगीतले. दरम्यान, या आगीमुळे साहित्य जळून खाक झाल्याने सोनवणे कुटूंबियांना अश्रू अनावर झाले. मात्र, आगीत संपूर्ण संसारपयोगी साहित्य जळून खाक झाली होती.