पाथर्ली येथील गॅस शवदाहिनीचे तात्काळ लोकार्पण करण्याची मनसेची मागणी

0

डोंबिवली – शहरात गेल्या अनेक वर्षांपासुन शिवमंदीर येथे केवळ एक गॅस शवदाहिनी आहे.पर्यावरण दृष्ट्या गॅस शवदाहिनी ही काळाची गरज आहे.ही शवदाहिनी सात दिवसात सुरु करा.अन्यथा आंदोलन करु असे डोंबिवली मनसे शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

घरत यांनी केडीएमसी ला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, या संदर्भात १९ डिसेंबर २०१६ रोजी आपणांस पत्र देऊन मी पाथर्ली येथील गॅस शवदाहिनी तात्काळ सुरु करुन त्याचे लोकार्पण करणे बाबत कळविले होते.या शवदाहिनी साठी मी लोकप्रतिनिधी असताना ७५ लक्ष रुपयांची तरतुद क.डों.म.पा. च्या अंदाजपत्रकात करुन घेतली होती.तसेच सातत्याने त्याचा पाठपुरावा करुन २०१५ च्या सार्वत्रिक निवडणुकां आधी त्याचे ९०% काम पुर्ण करुन घेतले होते. उर्वरीत १०% काम करण्यासाठी प्रशासनाला तब्बल दिड वर्ष लागले आता अतिशय शुल्लक काम बाकी असुनही ते सुद्धा प्रशासनाला लवकर करण्याची इच्छा दिसत नाही.

मनसे डोंबिवली च्या वतीने बुधवारी या संदर्भात अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना निवेदन देण्यात आले. सदरच्या गॅस शवदाहिनी चे काम सात दिवसात पुर्ण करुन त्याचे लोकार्पण न केल्यास मनसेला आंदोलन करावे लागेल असा इशारा मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज प्रकाश घरत यांनी यावेळी दिला. सदर प्रसंगी विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर, उपविभाग अध्यक्ष संदिप म्हात्रे, रविंद्र गरुड, विजय शिंदे उपस्थित होते.