कल्याण : कल्याण पूर्वेकडील पुना लिक रोड लगत राहणारे विजय विश्वकर्मा हे मानेरे गाव स्मशानभूमी कडून चालत येत असताना श्रीराम चौक येथे पाठीमागून आलेल्या प्रदीप कुमार गौतम यांच्या चारचाकी गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. यात विश्वकर्मा गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.