पानगल्ली येथे घरफोडी

0

बारामती । बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सुमारे 1 लाख 25 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना पानगल्ली येथे घडली. दत्ता अहिवळे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व 1 लाख 20 हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून सहायक पोलिस निरिक्षक सुनिल गायकवाड अधिक तपास करीत आहेत.