महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश
पुणे : पानशेत पूरग्रस्तांसाठीच्या निर्णयांची अंमलबजावणी करा असे आदेश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी दिले. पानशेत गाळेधारक पूरग्रस्तांबाबत झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी महसूलमंत्री पाटील यांच्या मुंबईतील कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला पालकमंत्री गिरीश बापट, आ. मेधा कुलकर्णी, आ. माधुरी मिसाळ, पानशेत पूरग्रस्त समितीचे अध्यक्ष मंगेश खराटे, रमेश काळे, अप्पर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे उपस्थित होते. गाळेधारकांकडून मालकी हक्काची रक्कम भरून घेणे, पूरग्रस्तांनी त्यांच्या गाळ्याभोवती केलेली अतिक्रमणे नियमित करणे याबाबत कार्यवाही तत्काळ सुरू होईल, असे आ. मेधा कुलकर्णी यांनी सांगितले.