चाकण : उद्योग पंढरीचे नाक असलेली चाकण औद्योगिक वसाहत वाहन उद्योगासाठीही अल्पावधीत नावारूपास आली आहे. देशासह बहुराष्ट्रीय कंपन्यांनी व अनेक उद्योजकांनीही लहान मोठे कारखाने उभे करून उद्योगवाढीस हातभार लावला आहे. नुकताच ऑटोकॉम्प कार्पोरेशन पानसे प्रा. लिमिटेड कपंनीच्या एक्स्पोर्ट ओरिएंटेड वास्तूचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करून कंपनीचा विस्तार केला. औद्योगिक वसाहतीत ऑटोकॉम्प कार्पोरेशन पानसे प्रा. लि.कंपनी गेली अनेक वर्षांपासून वाहन उद्योगांसाठी पार्ट तयार करण्याचे काम करीत असून, कंपनीने जागतिक पातळीवरील वाहनांसाठी लागणारे पार्ट तयार करण्याकरिता नवीन एक्स्पोर्ट ओरिएंटेड शॉप उभारले आहे.
…मान्यवरांची उपस्थिती
या शॉपचा उद्घाटन सोहळा नुकताच साजरा करण्यात आला, यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, माजी आमदार कृष्णराव भेगडे, संत तुकाराम साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बापूसाहेब भेगडे, पिंपरी-चिंचवड नगरपालिकेचे गटनेते एकनाथ पवार, नगरसेविका शीतल शिंदे, मास्क पॉलिमरचे संचालक राजेश म्हस्के, लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, ऑटोकॉम्प कार्पोरेशन कंपनीचे संचालक जयदीप पानसे, नित्यानंद पानसे, एस. डी. पानसे आदींसह कामगार व कर्मचारी उपस्थित होते.
…प्रकल्पाचे कौतुक
सरव्यवस्थापक पानसे यांनी सांगितले की, कंपनीकडून वाहनांना लागणारे सुटे पार्टचे उत्पादन करून ते महिद्रा, बजाज व टाटा कंपनींना पुरवले जातात. परंतु यापुढे एक्स्पोर्ट ओरिएंटड या शॉपमध्ये जागतिक पातळीवरील वाहनांना लागणारे सुटे पार्ट तयार करून एक्स्पोर्ट करण्यात येणार आहेत. आमदार लक्ष्मण जगताप यांनी पानसे कंपनीने परदेशी गंगाजळी रहावी यासाठी केलेल्या प्रयत्नाचे कौतुक केले. तसेच कंपनीतील मानव संसाधन विकास प्रयत्नांची प्रशंसा केली. पानसे समूहाने उद्योगाच्या विकासास शिस्त, चिकाटी व नेतृत्व गुणांची प्रशंसाकरून, आजच्या तरूण पिढीने त्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन माजी आमदार कृष्णराव भेगडे केले. आमदार महेश लांडगे, गटनेते एकनाथ पवार आदींनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक राजीव पानसे यांनी केल तर नित्यानंद पानसे यांनी आभार मानले.