मुंबई : ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवत आहे. मात्र, चित्रपटांना लागलेले पायरसीचे ग्रहण मिटवण्यासाठी उरीच्या टीमने अनोखी शक्कल लढविली आहे.
https://www.youtube.com/watch?v=LZunXGGflA4
२०१६ साली उरीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक केले होते. याच सर्जिकल स्ट्राईकचा थरार या चित्रपटातून उलगडण्यात आला आहे. मात्र, काही वेबसाईटवर एखादा चित्रपट प्रदर्शित झाला की लगेच लीक केला जातो. अशा वेबसाईट्सना धडा शिकविण्याकरता ‘उरी’च्या टीमने स्वत:च एक व्हिडिओ या साईटवर अपलोड केला आहे. यामी गौतम या व्हिडिओत म्हणताना दिसतेय, की जर आमची आर्मी त्यांच्या परिसरात घुसून आतंकवाद्यांचा खात्मा करू शकते, तर आम्ही तुमच्या टोरन्टमध्ये नाही का घुसू शकत? त्यानंतर विकी कौशल प्रेक्षकांना आवाहन करताना दिसला.