पायरीवर बसण्याच्या वादातून दोन गट भिडले : सावद्यातील 18 आरोपींना अटक

मुले पायरीवर बसण्यातून शाब्दीक वाद विकोपाला : दोन्ही गटाकडून लोखंडी रॉड, लाकडी बॅटसह लाठ्या-काठ्यांचा सर्रास वापर

Two groups clashed over a minor cause in Sawada : 18 suspects Arrested सावदा : शहरातील तडवी वाड्यात बुधवार, 28 रोजी सायंकाळी पायरीवर बसण्याच्या किरकोळ कारणावरून शाब्दीक वाद वाढत गेल्याने दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही गटाकडून लोखंडी रॉड, लाकडी बॅटसह लाठ्या-काठ्यांचा सर्रास वापर करण्यात आल्याने दोन्ही गटातील सुमारे आठ जण जखमी झाले. या प्रकरणी सावदा पोलिसात दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी तक्रारी करण्यात आल्यानंतर 37 संशयीतांविरोधात दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 18 संशयीतांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

तडवी वाड्यात भिडले दोन गट
सावदा शहरातील काझीपूरा भागातील महिलांच्या सार्वजनिक शौचालयाजवळील नाल्यावर तडवी वाड्यातील दोन गटात नगरपालिका हॉलच्या पायर्‍यांवर तडवी समाजातील मुले बसण्याच्या कारणातून शाब्द वाद वाढला. पाहता-पाहता या वादाचे रुपांतर हाणामारीपर्यंत पोहाचल्याने दोन्ही गट भिडले. लोखंडी रॉड, मोठी लाकडी बॅट, लाठ्या-काठ्या, दगड विटांचा मारा करण्यात आल्याने दोन्ही गटातील आठ जण जखमी झाले.

पहिल्या गटाच्या तक्रारीवरून 29 जणांविरोधात गुन्हा
पहिल्या गटातर्फे नवाब उस्मान तडवी (काझीपूरा, तडवी वाडा, सावदा) यांनी फिर्याद दिल्यावरून मुराद शेरखा तडवी, जावेद शेरखां तडवी, नवाज कासम तडवी, सलीम चांदखा तडवी, रमजान चांदखा तडवी, नवाज रमजान तडवी, अमीन रमजान तडवी, सलमान जुम्मा तडवी, आदिल शब्बीर तडवी, अक्रम करीम तडवी, खातूनबाई चाँदखाँ तडवी, अशीनबाई दगडु तडवी, दगडु नमाज तडवी, सुपडाबाई अय्युब तडवी, शबानाबाई मुराद तडवी, बैतुल करीम तडवी, सायराबाई सायबु तडवी व इतर जमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसर्‍या गटाचीही तक्रार
दुसर्‍या गटातर्फे अमीर रमजान तडवी (19, काजीपुरा खालचा तडवी वाडा, सावदा) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार सुलतान कादर तडवी, अमीन कादर तडवी, शाहरुख रशीद तडवी, राजु अनवर तडवी, नवाब उस्मान तडवी, समीर सलीम तडवी, रहेमान परबत तडवी, जमीर हमीद तडवी, शेख गफ्फार तडवी, अरबाज राजु तडवी, मोईन आमद तडवी, आसीफ अहमद तडवी, जुबेर अल्लाउद्दीन तडवी, अनिस हबीब तडवी, आमद चोंदखा तडवी, सखुबाई शरीफ तडवी, रशिदा आमद तडवी, गुलशान रहेमान तडवी, हसीना खलील तडवी, दगुबाई सलीम तडवी (सर्व रा.वरचा तडवी वाडा, काजीपुरा, सावदा) व इतर 5 ते 6 इसम नाव माहित नाही अशांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक देविदास इंगोले, उपनिरीक्षक समाधान गायकवाड, हवालदार उमेश पाटील व सहकारी करीत आहेत.