पायावरून ट्रक्टर गेल्याने तरूणी जखमी

0

जळगाव – शहरात खरेदीसाठी मैत्रिणीसोबत फुले मार्केटमध्ये आलेल्या विद्यार्थिनीच्या पायावरून मंगळवारी दुपारी 1.30 च्या सुमारास वाळूने भरलेले ट्रॅक्टर गेले. दरम्यान, चालकाने घटनास्थळाहून पळ काढला. एरंडोल तालुक्यातील भातखंडे येथील विद्यार्थिनी शुभांगी सुनील पाटील वय-24 मैत्रिणीसह शहरातील फुले मार्केटमध्ये खरेदीसाठी आली होती. खरेदी केल्यानंतर दोघी टॉवर चौकाजवळ उभ्या असताना शिवाजीनगरकडून भरधाव वेगात जात असलेल्या ट्रॅक्टर क्रमांक एमएच.19.6821 ने तिच्या डाव्या पायाच्या पंजावरून ट्रॅक्टरचे चाक नेले. अपघातानंतर ट्रॅक्टरचालकाने लागलीच घटनास्थळाहून पळ काढला.