पायी वारी पंढरपूरकडे रवाना!

0

22 जुलैला पोहचणार पंढरपूर; 22 ठिकाणी मुक्काम
संत सखाराम महाराज संस्थांतर्फे आयोजन; प्रसाद महाराज यांचे मार्गदर्शन
अमळनेर- संत सखाराम महाराजांच्या जयघोषात मूखी हरीनाम जपत हातात भगवा ध्वज घेवून वाडी संस्थानची पंढरपूरसाठीची पायी वारी आज 29 रोजी संत प्रसाद महाराज यांचे प्रमूख मार्गदर्शनाखाली दू 12 वाजता पैलाड येथील तूळशीबागेतून निघाली. 22 दिवसाच्या मूक्कामानंतर ही दिंडी 22 जूलैला पंढरपूरात दाखल होणार आहे. प्रसाद महाराजांच्या या दिंडीचे अखंडीत 31वे वर्ष आहे. पहाटे स्नान संध्या आटोपून प्रसाद महाराज यांनी अंबर्षी महाराजांचे दर्शन घेवून पैलाड येथील तूळशीबागेत आलेल्या शेकडो भाविकांना खडीसाखरेचा प्रसाद दिला. यावेळी महिलांनी डोक्यावर तूळस घेवून पांडूरंगाचा जप केला. पांढरा शूभ्र वस्त्र परिधान करून डोक्यावर घोंगडी घेवून महाराजांनी दुपारी 12वा अमळनेरकरांचा निरोप घेतला त्यांचे मागे वारकर्‍यांचा जथ्था होता वाडी संस्थान मध्ये प्रसाद महाराजांची निघणार्‍या पायी वारीत सूमारे 300 वारकरी सहभागी झाले आहेत हि संख्या पंढरपूर पर्यंत 2 हजारावर पोहचते.

परोळा येथे पहिला मुक्काम
दिंडीचा पहिला मूक्काम पारोळ्याला आजचा असून तेथून आडगांव भडगांव नगरदेवळा नेरी नागद बिलखेडा नागापूर पिशोर चिखलठाण टाकळी दौलताबाद वाळूंज महारूळ पैठण शेवगांव पाथर्डी धामणगांव कडा आष्टी अरणगांव जवळा करमाळा निंभोरा वडशिवणे सापटणे करकंब मार्गे दि.22जूलै ला पंढरपूरात दाखल होईल आडवळणाने नदी नाले व काटेरी झूडपातून ही वारी 7ते 8 जिल्हे पार करून पोहचते वारकर्‍यायांचे व दिंडीचे नियोजना साठी येवले आप्पा दिलीप जोशी भांडारकर अनिल भालेराव ऊदय देशपांडे आबा नेरकर, हरिभाऊ चौधरी यांचे सह संस्थानचे सेवेकरींचे सहकार्य लाभते.

पाणी, प्रसादाची व्यवस्था
त्यांच्या दर्शनासाठी व निरोप देण्यासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली दूपारी 12 वाजता दिंडीचे प्रस्थान झाले. खोकरपाट मार्गे दू 5 वाजता दिंडी सडावणला पोहचली, तेथून पारोळ्याला उशीरा पहिल्या मूक्कामासाठी दाखल झाली. पारोळ्या पर्यंत 500 हून अधिक भाविक पायी वारीत सहभागी झाले होते. वारकर्‍यांचे सर्वांनी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. तर सडावण गावात मोठा भंडारा सालाबादा प्रमाणे करण्यात आला यात वारकरींसह ग्रामस्थांनी प्रसादाचा लाभ घेतला. 30 रोजी ही दिंडी पारोळ्याहून प्रस्थान करेल, दिंडीच्या मूक्कामाचे ठिकाण व गाव निश्‍चित असते ही सुमारे 200 वर्षापासूनची परंपरा कायम सूरू असून संस्थानचे अकरावे गाधीपती प्रसाद महाराज यांचे अखंडीत 31 वे वर्ष आहे चार महीन्यांचा चातूर्मासातील मूक्काम आता महाराजांचा पंढरपूरात राहील.