पाय घसरून डोहात पडलेल्या वृद्धाचा मृत्यू : मयत आमोद्यातील रहिवासी

An elderly man in Amodia died after drowning in a mill जळगाव : गिरणा नदीच्या डोहात पाय घसरून पडल्याने 65 वर्षीय वयोवृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार, 12 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता उघडकीस आली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. उत्तम रामसिंग सूर्यवंशी (65, आमोदा बु.॥ ता.जळगाव) असे मयताचे नाव आहे.

गुरे चराईदरम्यान दुर्घटना
उत्तम रामसिंग सूर्यवंशी (65, आमोदा बु.॥) शेती व गुरे चारण्याचे काम करून उदरनिर्वाह करीत होते मात्र गुरुवार, 10 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता ते गुरे चराईसाठी गेल्यानंतर गिरणा नदीपात्रातील गमर्‍या डोहात त्यांचा पाय घसरल्याने ते पाण्यात बुडाले. दरम्यान दोन दिवसानंतर शनिवार, 12 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला. यावेळी नातेवाईकांनी त्यांच्या घटनास्थळी धाव घेतली. याबाबत जळगाव तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली. जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेबाबत जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सायकर करीत आहे.