अमळनेर – सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास शेतातून परतत असतांना शेततळ्यात पाय घसरून १० वी च्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील वावडे येथे घडली. सकाळी प्रवीण सुरेश पाटील हा वडिलांसोबत सकाळी शेतात कपाशी लावण्यासाठी गेला होता. त्यावेळी परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस ते परत येत होते, यावेळी मुडी वावडे रस्त्यानजीक असलेल्या एका शेततळ्यात त्याचा पाय घसरला यावेळी त्याच्या सोबत असलेल्या वडीलांनी वाचविण्यासाठी प्रयत्न केले, पण निरर्थक ठरले.
याबाबत माहिती मिळताच पंचायत समिती सभापती वजाबाई भिल यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले त्याचे शवविच्छेदन करून त्याला नातेवाईकांच्या ताब्यात दिले असून मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे