पुणे : गेल्या वर्षी जिल्हा परिषदेने 35 लाखांचे ढोल ताशा आणि 45 लाखांचे सौरकंदिल दिवेखरेदी केलीहोते. हे ढोल-ताशा आणि सौरकंदिल लाभार्थ्यांना वितरितच केले नसल्याचा गंभीर प्रकार सर्वसाधारण सभेत समोर आल्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या माजी सभागृहाने ग्राम पंचयातीना पारंपरिक वाद्य पुरविण्यासाठी 35 लाखांची तरतुदी केलीहोती. या तरतुदीमधून ढोल-ताशांची खरेदी केली होती. यामध्ये पन्नास टक्के ढोल-ताशा हवेली व शिरूर तालुक्यासाठी मंजूर करण्यात आले होते. मात्र ग्रामपंचायतीने हे ढोल-ताशे नेले नाहीत. यामुळे या ढोल-ताशांची दूरवस्था झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या सूचीमध्ये ढोल-ताशा खरेदीचा विषय नाही. तरी फक्त ठेकेदारांच्या फायद्यासाठी ढोल-ताशा विकतघेतले. याप्रमाणेच महिला व बालकल्याण विभागाने सौरकंदिल खरेदीसाठी 45 लाखाची तरतूद केलीहोती. या तरतुदीने सौरकंदिलांची खरेदी करण्यात आली. मात्र, तालुका निहाय लाभार्थ्यांची यादी निश्चित न केल्याने सौरकंदिलांचे एक वर्षापासून वाटप झालेनाही. समाजकल्याण विभाग आणि महिला व बालकल्याण विभागाचा 70 टक्के निधी चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आला आहे. यामुळे जिल्हा परिषदेचे आर्थिक नुकसान झाले आहे. या योजना लाभार्थ्यांच्या ऐवजी ठेकेदारांच्या हितासाठी राबवित असल्याचा आरोप भाजपचे गटनेतेशरद बुट्टे-पाटील यांनी सर्वसाधारण सभेत केला होता. त्यामुळे आता या खरेदी प्रकरणी चौकशी करण्यात येणारआहे.
माहिती घेतल्यानंतर निर्णय
जिल्हा परिषदेच्या सूचीमध्ये एखाद्या वस्तूचे नाव नसले, तरी वस्तूखरेदीकरता येते. सूचीमध्ये सर्वच वस्तूंची नावे दिली जात नाहीत. ढौल-ताशा आणि सौरकंदिलांची सद्यस्थिती काय आहे. लाभार्थ्यांना वस्तू मिळाल्या की नाही. या सर्वांची माहिती घेतली जाणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
– दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी