भुसावळ। हिंदू नववर्षारंभापासून म्हणजेच चैत्र शुध्द पाडवा अर्थात गुढीपाडव्या पासुन सुरु झालेल्या चैत्री नवरात्रोत्सवानिमित्त श्री अष्टभुजादेवी मंदिराच्या प्रांगणात रविवार 2 रोजी येथील सहस्त्र औदिच्य ब्राहमण समाजातील महिला व पुरुषांनी पारंपारिक गरबा नृत्य करुन देवी भगवतीची आराधना केली. नवरात्रोत्सवात देवीच्या कार्याची महती विषद करणारे विविध कार्यक्रम देशात विविध ठिकाणी साजरे केले जातात. त्याचप्रमाणे भुसावळ मध्ये देखील सुमारे 80 दशके प्राचीन असलेल्या प्राचीन श्री भगवती अष्टभुजा देवी मंदिराच्या प्रांगणात चैत्र शुध्द षष्ठी निमित्ताने सहस्त्र औदिच्य ब्राहमण समाजातील महिला व पुरुषांसह बालकांनी पारंपारिक गरबा नृत्य करुन देवी भगवतीची आराधना केली.
सहस्त्र औदिच्य ब्राह्मण समाजाचा उपक्रम
सुरूवातीला देवी भगवतीच्या प्रतिमेचे पारंपारिक पध्दतीने महिलांनी पूजन केले. नंतर समाजातील श्रीमती लीलावती ठक्कर, लता जोशी व उत्सव पंडया या ज्येष्ठ महिलांचा आशिर्वाद घेऊन ध्वनि- मुद्रिकेवरील देवी महिमा वर्णन करणार्या गाण्यांच्या तालावर पदन्यास करीत गरबा नृत्याला प्रारंभ केला. सर्वप्रथम रजनी रावल, सीमा ठक्कर, नंदिनी जोशी, रुपाली ठक्कर, रेखा पंडया, छाया पंडया, सुनिता पंडया, सृष्टी पंडया, आस्था जोशी, प्रीती पंडा, राधा पंडा, ज्येाती जोशी, अनिता पंडया, सोनू पंडया, नीलम जोशी, वैष्णवी भट, विजया पंडया, प्रियंका पंड्या, चेतना पंड्या, पलक भट व आश्री पंडा या महिलांनी नृत्य सादर केले. नंतर गौतम पंडया, विशाल ठक्कर, वरुण जोशी, प्रतिक पंडया, अमित पंडया, राहुल पंडया, हार्दिक पंडया, संदेश शर्मा, केशव पंडया, रूद्र पंडया आदींनी देवी महिमा वर्णन करणार्या गाण्यांवर गरबा नृत्य केले. नृत्य आराधनेनंतर देवीची आरती करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी येथील सहस्त्र औदिच्य ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष निरंजन रावल, महासचिव नंदकिशोर पंडया यांच्यासह विजयकुमार ठक्कर, ईश्वरलाल जोशी, अशोक भट, प्रविण जोशी, कपिल रावल, रुचिर जोशी, बंटी जोशी, विशाल ठक्कर आदींनी परिश्रम घेतले.