धुळे। शहरासह जिल्हयात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी महिलांनी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून बैलांची पूजा केली. शहराच्या रस्त्या रस्त्यांवर बैलांच्या सजलेली जोड्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. धुळे तालुक्यातील नेर कूसूबा, फागणे, सोनगीर,चितोड, रावेर ,अवधान येथे पोळ्याचा उत्साह ओसंडून वाहत होता. तर शिरपूर, साक्री, शिंदखेडा तालुक्यातदेखील बैल पोळा सण दिमाखात साजरा करण्यात आला. गेल्या महिन्यात भरापासून दंडी मारल्याले पावसाचे पोळयाच्या पूर्व संध्येला जोरदार आगमन झाल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पहायला मिळल होते. ठिकठिकाणी गावातून सर्जा-राजाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिलांनी बैलांना पुरणपोळीचा नवैद्य दिला.
महिन्याभरापासून पोळ्याची तयारी
सकाळी बैलांची शिंगे घासून अंघोळ घालण्यात आली. नंतर शिंगावर हिंगोलाचा लेप देण्यात आला. बेगड चमकीचा काग, शिंगावर घुंगराच्या पितळी छमब्या, गळ्यात घोगल पट्टी चंगाळे, पितळी घंटी, नवीन माथूट, मोहरकी, वेसण, कासरा, अंगावर रंगाचे पट्टे, सजवलेली कपड्याची झूल असा साज लेवून बैलांची मिरवणूक काढण्यात आली. मारुती मंदिरात मिरवणुकीची सांगता झाली. प्रत्येक गावातील वेशीवर मानाच्या बैलांची पूजा करण्यात आली. ज्यांच्याकडे बैल नाही. त्यानी घरीच मातीच्या बैलांची पूजा करत पोळा सण साजरा करण्यात आला.
काटवान परीसरात पोळा उत्साहात
काटवान परिसर । साक्री तालुक्यातील काटवान परिसरात पोळा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. काटवान भागात दोन दिवसांपासून काही प्रमाणात पाऊस पडला. म्हणून शेतकरी काही प्रमाणात आनंदाने पोळा सण साजरा करित दिघावे येथे वाजत गाजत बैलांना गावात मिरवणूक काढण्यात आली. पारंपारीक पद्धतीन बैलाची पूजा करण्यात आली. सोबत फोटोमध्ये प्रा.पानपाटील बैलांना पूजा करताना दिसत आहे.
नविन बोराडीत बैलांची मिरविणुक
शिरपुर । ग्रामिण भागात कृषीप्रधान संस्कृतीतला शेतकर्यांसाठी अत्यंत महत्वाचा सण उत्सव मानला जाणारा पोळा हा सण दरवर्षी प्रमाणे यंदाची तालुक्यातील न्यु बोराडी येथे मोठ्या थाठात व उत्सहात साजरा करण्यात आला. बैलांना रंगरोटी करुन, सजवुन, घुंगरु बांधुन गावभर ढोलताश्याच्या गजरात वाजत गाजत त्यांची मिरवणुक काढण्यात आली. त्यानंतर ग्रामदैवत असलेल्या महादेव मंदिरावर जाऊन त्यांची पुजा करण्यात आली. येथील ग्रामस्त वर्षानुवर्ष बेंदुर या सणाची परंपरा आजही जपताहेत. संध्याकाळी बैलांना शेतातुन नुकतेच काढण्यात आलेल्या नवैद्य दाखविण्याची परंपरा अजुन ही याठीकाणी कायम आहे. तसेच पुरण पोणी घालुण त्यांना ओवाळले गेले. यावेळी सरपंच दिलीप तडवी, माजी सभापती नारसिंग पावरा, प्रा.रमेश पावरा, कुमारसिंग पावरा, नाना खैरनार, अमरसिंग पावरा आदि उपस्थित होते.