पारंबीतील तरुणाची आत्महत्या : एकाला अटक

Construction dispute escalates: First hand veins cut, then Parambi youth commits suicide in well: One arrested
मुक्ताईनगर : तालुक्यातील पारंबी येेथे बांधकामाचा वाद विकोपाला गेल्यानंतर 29 वर्षीय तरुणाने हाताच्या नसा कापत विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी एकाविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. विशाल उर्फ गोलू उखर्डा गव्हाळ (29) असे मयत तरुणाचे नाव आहे तर हरीचंद्र भिकाजी दाणे (पारंबी) यांना तरुणाच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आली.

बांधकाम वादातून संपवले जीवन
हरीचंद्र दाणे यांच्या घराशेजारी विशाल गव्हाळ याचे बांधकाम सुरू असून मागील आठ दिवसांपासून दोघांमध्ये जागेवरून वाद होता. त्यामुळेच मुलगा विशालने 8 रोजी सकाळी शौचालयाच्या जाण्याच्या बहाण्याने हाताच्या दोन्ही नसा कापून घेतल्या व नंतर बाळू त्र्यंबक यांच्या विहिरीत आत्म्हत्या केली. या प्रकरणी उखर्डा बळीराम गव्हाण यांच्या फिर्यादीवरून आरोपी हरीचंद्र दाणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

पारंबी गावात शोककळा
मयत विशाल गव्हाळच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल बोरकर, कुर्‍हा पोलिस दुरक्षेत्राचे सहाय्यक फौजदार श्रावण जवरे, हरीश गवळी, प्रदीप इंगळे, सागर सावे, राहुल नावकर, संजय लाटे, गोपीचंद सोनवणे, बिराजदार आदी करीत आहेत.