देहूरोड : देहूरोड येथील पारशीचाळभागात राहणारी 16 वर्षीय मुलगी चीप्स् आणण्यासाठी घरातून बाहेर पडली ती परतलीच नाही. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घटना घडली. याप्रकरणी पोलीसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. अपहृत मुलीच्या आईने (वय 37 वर्षे) याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
देहूरोड पोलीसांच्या माहितीनुसार, सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घराजवळील आबुशेठ रस्त्यावरून बटाटा चिप्स् आणण्यासाठी गेली होती. बराच उलटला तरी ती परतली नाही. पालकामनी तिचा या भअगात कसून शोध घेतला. मैत्रिणीच्या घरी गेली असावी या संशयाने सर्व मैत्रिणींची घरे तपासली मात्र, ती मुलगी कुठेही आढळुन आली नाही. त्यामुळे तिच्या आईने देहूरोड पोलीसांकडे धाव घेतली. संबंधित मुलगी अल्पवयीन असल्यामुळे पोलीसांनी घटनेचे गांभिर्य ओळखून यापेकरणी अज्ञातांविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखळ केला आहे. पोलसि निरीक्षक अरूण मोरे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.