मुंबई : एकेकाळची मुंबईतील सर्वात जुनी जमात म्हणून ओळखले जाणारे पारसी धर्मीय आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आता पारसी धर्मीयांनीच त्यांची जमात वाचावी म्हणून पुढाकार घेतला आहे. त्यासाठी मुंबईत विचारमंथन करण्यात आले. 2001च्या जनगणनेनुसार भारतात पारसी धर्मियांची संख्या 69 हजार 601 होती, तिच 2011च्या जनगणनेनुसार 57 हजार 264 इतकी झपाट्याने कमी झाली आहे.
विविध संघटना एकवटल्या
एकीकडे देशाची लोकसंख्या मागील 60 वर्षांत तिप्पट वाढली असतांना पारशी धर्मीयांची लोकसंख्या मात्र 1941 पासून सरासरी 50 टक्क्यांपर्यंत खाली घसरली. म्हणून परझन फाऊंडेशन, टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स, फेडरेशन ऑफ झोरॅस्ट्रीयन अजुमन्स ऑफ इंडिया या सर्वांनी संयुक्तपणे पारसी बचाव मोहीम सुरू केली आहे.
लोकसंख्या वाढीसाठी धोरणात्मक निर्णय
24 सप्टेंर 2013 रोजी पारसी धर्मातील घटती लोकसंख्या थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी वैद्यकीय बदल, तसेच धोरणात्मक निर्णयांचा सामावेश करण्यात येत आहे. जेणेकरून भारतातील पारसी धर्मीयांची घटत चाललेली लोकसंख्या थांबेल आणि ही लोकसंख्या वाढेल. ज्यात पारसी दाम्पत्यांमध्ये वंधत्वाचे वाढते प्रमाण कसे कमी होईल, यावरही गांभीर्याने विचार सुरू झाला आहे.
दोन टप्प्यांत प्रयत्न सुरू
पारसी लोकसंख्या वाढवण्यासाठी दोन टप्प्यांत प्रयत्न सुरू असून पहिल्या टप्प्यात हा विषय वैद्यकीय, मानसिक आणि नातेसंबंध या स्तरावर हाताळण्यात येणार आहे. त्यासाठी अधिकाधिक पारसी तरुणांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. तरुणांना तारुण्यातच विवाह करण्यासाठी आग्रह धरण्यात येणार आहे. ज्यामुळे जन्मदर वाढेल आणि पुढील 10 वर्षांत पारसी धर्मीयांचा जन्मदर स्थिरावेल, असा विश्वास डॉ. काट्य गांदेवा यांनी व्यक्त केला. दरम्यान सरकारनेही पारसी धर्मीयांची लोकसंख्या वाढावी म्हणून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याने ते म्हणाले.
57 हजार देशभरात उरले
2001 मधील एकूण पारसी- 61,601
2011 मधील एकूण पारसी लोकसंख्या देशात उरले- 57, 264
60 दशकांपासून घटले पारसी- 50 टक्के