पारस ग्रुपचे पेमराज बोथरा यांना आदर्श व्यापारी पुरस्कार

0

पुणे : दि पूना मर्चंट्स चेंबरच्या आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कारांची घोषणा अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. राज्यस्तरावरील पुरस्कार पारस ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक पेमराज माणिकचंद बोथरा,पुणे शहर आणि जिल्हास्तरावरील पुरस्कार पी.एन.गाडगीळ सन्सचे संचालक गोविंद विश्वनाथ गाडगीळ आणि चेंबर सभासदांमधून देण्यात येणारा पुरस्कार झुंबरलाल मोहनलाल ललवाणी कंपनीचे संचालक झुंबरलाल ललवाणी यांना जाहीर झाला आहे.

पुरस्कार वितरण समारंभ दि.6 सप्टेंबर रोजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालक मंत्री गिरीश बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. पुरस्कार उपक्रमाचे यंदाचे 23 वर्ष आहे. मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असते, असे ओस्तवाल यांनी पत्रकारांना सांगितले. यावेळी उपाध्यक्ष जवाहरलाल बोथरा, सचिव अशोक लोढा, सहसचिव विजय मुथा, नगरसेवक प्रवीण चोरबोले, वालचंद संचेती आणि राजेंद्र बांठिया उपस्थित होते.