पारोळा उपकोषागार अधिकारी धुळे एसीबीच्या जाळ्यात

0

भविष्य निर्वाह निधीची रक्कम वर्ग करण्यासाठी एक हजारांची स्वीकारली लाच

पारोळा- पारोळा उपकोषागार कार्यालयातील उपकोषागार अधिकारी शिवदास हंसराज नाईक (50) यांना एक हजारांची लाच घेताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कार्यालयात सोमवारी दुपारी तीन वाजता अटक केली. तक्रारदाराला मंजूर झालेली भविष्य निर्वाह निधीची 80 हजारांची रक्कम
वनक्षेत्रपाल यांच्या शासकीय खात्यात जमा करण्यासाठी संशयीत आरोपीने एक हजार 200 रुपये लाचेची मागणी केली होती तर या प्रकरणात एक हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. आरोपीने पंचांसमक्ष कार्यालयात एक हजारांची लाच घेतल्याने त्यांना अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक नीलेश सोनवणे, उपअधीक्षक शत्रृघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश भोरटेकर, पोलिस निरीक्षक पवन देसले, नरेंद्र कुलकर्णी, जयंत साळवे, संतोष हिरे, संदीप सरग, कृष्णकांत वाडीले, सतीश जावरे, प्रशांत चौधरी, कैलास जोहरे, सुधीर सोनवणे, शरद काटके, भूषण खलाणेकर, प्रकाश सोनार, संदीप कदम, सुधीर मोरे आदींच्या पथकाने केली.