पारोळा। शिवसेनेच्या उपनगराध्यक्षा वर्षा पाटील यांनी सहा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण करून राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त पदावर मंगळवारी भाजपच्या रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. पारोळा पालिकेत भाजप 7, शिवसेना एक अपक्ष असे 13 सदस्य एकत्र आहेत.
उपनगराध्यक्ष वर्षा पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी निवड प्रक्रिया मंगळवारी राबवण्यात आली. पीठासन अधिकारी तहसीलदार वंदना खरमाळे होत्या. तर सहायक म्हणून मुख्याधिकारी सचिन माने होते. नगराध्यक्ष करण पवार, भाजपचे गटनेते बापू महाजन, शिवसेनेचे गटनेते मंगेश तांबे, नगरसेवक अंजली पवार, जयश्री बडगुजर, अलका महाजन, नवल सोनवणे, मोनाली राजपूत आदी उपस्थित होते.