पारोळा पंचायत समिती सभापतीविरुद्ध अविश्‍वास

0

पारोळा प्रतिनिधी । येथील पंचायत समिती सभापती सुनंदा पांडुरंग पाटील यांच्या विरोधातील अविश्‍वास अखेर पारित झाला असून यामुळे येथे सत्तांतर झाले आहे.

येथील पंचायत समिती सभागृहात नायब तहसीलदार पंकज पाटील यांच्या उपस्थितीत प्रकिया घेण्यात आली. या वेळी राष्ट्रवादीचे उपसभापती ज्ञानेश्‍वर पाटील, अशोक नगराज पाटील, छायाबाई राजेंद्र पाटील, तर शिवसेनेचे प्रमोद जाधव, छाया जितेंद्र पाटील व रेखाबाई देविदास भिल यांच्यासह विद्यमान सभापती सुनंदा पाटील उपस्थित होत्या तर भाजप सदस्या सुजाता बाळासाहेब पाटील अनुपस्थित राहिल्या. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी पंकज पाटील यांनी दाखल केलेल्या अविश्‍वासावरील मुद्द्यावर उपस्थित सदस्यांची मते जाणून घेतली. पंचायत समिती सभापती सुनंदा पांडुरंग पाटील यांच्या विरोधात शिवसेनेच्या तीन व राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांनी हात उंच करून मतदान केल्याने दाखल अविश्‍वास अखेर पारित झाला. राष्ट्रवादी सदस्यांनी आपल्याच पक्षाच्या विरोधात मतदान केले. भाजपचे सदस्य अनुपस्थित राहिले.