पारोळा येथील तरुणाची धुळ्यात बसखाली आत्महत्या

0

धुळे : पारोळा येथील तरुणाने बसस्थानकात परीसरात बसच्या मागील चाकात स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी पावणे दहा वाजता घडली. बस (एम.एच.२० डी.एल ०१०५) क्रमांकाची भुसावळकडून साक्रीकडे जाणारी बस धुळे शहरातील बसस्थानकातील ज्या मार्गाने बस आगाराच्या बाहेर निघते त्या मार्गावरील कोपऱ्यावरच ही दुर्घटना घडली.

पारोळा येथील भूषण कैलास शिंपी (२८) हा तरुण उभा होता़ बस ही आगाराच्या बाहेर निघत असतानाच अचानक या तरुणाने बस खाली येऊन आपले जीवन संपविले. बसचे चाक या तरुणाच्या पोटावरुन गेल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला़ घटना लक्षात येताच आरडा-ओरड झाल्याने बस जागेवरच थांबविण्यात आली़ गंभीर जखमी झालेल्या तरुणाला लागलीच भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता मृत घोषित करण्यात आले.