पारोळा येथे रिपाइंची 17 रोजी बैठक

0

पारोळा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाची तालुक्याची बैठक येथील पंचायत समिती सभागृहात शनिवार 17 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आली आहे. बैठकीस उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष रमेश मकासरे, जिल्हाध्यक्ष आनंदा बाविस्कर, जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव केदार उपस्थित राहणार असून आगामी जिल्हा परीषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये उमेदवार देणे, पक्षाच्या स्वबळावर निवडणूक लढवणे, उमेदवारसंदर्भात चर्चा करणे, मुलाखती घेणे, पक्ष वाढविण्यासंदर्भात शाखा स्थापन करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.