पारोळा । येथील पंचायत समितीच्या आवारात बुधवारी 31 रोजी आमसभा घेण्यात आली. आमसभेत विविध विषयांवर चर्चा झाली तसेच विविध विषयांवर ही सभा गाजली. यात प्रामुख्याने सिंचन, कृषी, रोजगार हमी योजना, जलयुक्त शिवार, घरकुल योजना, पाणी टंचाई, पुरवठा, महसूल, विहिरीचे अनुदान आदी विषयांवरुन सभेत तक्रारी मांडण्यात आल्या. सभेत दोन ग्रामसेवक, एक तलाठी व सिंचनचे अभियंत्याविरुद्ध कारवाईचा ठराव मांडण्यात आला. तहसीलदार खरमाडेची तक्रार नाशिक आयुक्तांकडे करणार असल्याचे आमसभेत सांगण्यात आले.
आमसभेस यांची होती उपस्थिती
सभेचे अध्यक्ष आमदार डॉ. सतिश पाटील उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील, डॉ. हर्षल माने, हिंमत पाटील, पंचायत समिती सभापती सुनंदा पाटील, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर पाटील, पंडीत पाटील, हिरामण पवार, दिगंबर पाटील, डॉ. शांताराम पाटील, मनोराज पाटील, बाळु पाटील, शेळावे सरपंच राजेंद्र पाटील, सुरेश पाटील, काळु पाटील, पांडुरंग पाटील, भास्कर पाटील, बबन पाटील, नाना पाटील, जितेंद्र पाटील, अशोक पाटील, किशोर पाटील, डी.के. पाटील. पोलीस उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे, प्र.तहसीलदार पंकज पाटील, गटविकास अधिकारी डॉ. बी.एस. सूर्यवंशी, मुख्याधिकारी डॉ.सचिन माने यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. बहादरपूर ग्रामपंचायतला स्मार्ट ग्राम योजनेतून दहा लाखांचे पारितोषीक मिळाल्याने ग्रामसेवकांचे स्वागत करण्यात आले. 2013 नंतर 2017 मध्ये झालेल्या आमसभेत प्रोसीडींग, (ठराव) केलेल्या तक्रारीबाबत आढावा घेण्यात आले.