पारोळा : शहरातील एका भागातील 25 वर्षीय विवाहितेचा पाठलाग करून विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात संशयीत महेश धोंडू साळुंखे (31, रा.पारोळा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळा पोलिसात गुन्हा दाखल
गुरुवार, 28 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास 25 वर्षीय विवाहिता एका किराणा दुकानातून सामान घेवून घरी जात असतांना संशयीत महेश साळुंखे (रा.पारोळा) याने पाठलाग करीत मोबाईल क्रमांक देण्याची मागणी करीत स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचा आरोप आहे. पीडीतेने पतीस ही बाब सांगितल्यानंतर आरोपीस जाब विचारल्यानंतर आरोपीने जातीवाचक शिविगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात महेश धोंडू साळुंखे (31, रा.पारोळा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपअधीक्षक राकेश जाधव करीत आहेत.