पारोळ्याच्या बँकेत पैसे मिळत नसल्याने नागरिक संतप्त

0

पारोळा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला चाळीस दिवस पूर्ण होत आहे. पाचशे आणि हजारांच्या नोटा बँकेत जमा करणार्‍यांची संख्या कमी झाली असली तरी आता सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक, पगारदार, शेतकरी, निवृत्त कर्मचारी सारे बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी लांबच लांब रांगा ागल्याची गर्दी सोमवारी 19 डिसेंबर रोजीही असल्याने सकाळी 10.30 वाजता गर्दी वाढत असल्याचे दिसून येत होते.

शहरातील भारतीय स्टेट बँकेत तटकळत उभे असलेल्या नागरिकांना 5 हजार रुपये मिळत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. दररोज 10 हजार रुपये बँकेतून काढता येईल, असा आदेश असतांना मात्र ग्राहकांना पाच हजार रुपये मिळत असल्याने अनेक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला. त्यामुळे वाहतुकही ठप्प झाली होती. मात्र पोलीस आल्याबरोबर रास्ता रोकोवाल्यांना पिटळून लावल्याचे नागरिकांनी सांगितले. तर अनेकांना पैसे मिळत नसल्याने स्टेट बँकेत नागरिकांनी गोंधळ घातल्याचे समजते. किती दिवस सहन करावा लागेल असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.