पारोळ्याजवळ सलग दुसर्‍या दिवशी अपघात ; पीकअप वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार ; दुसरा गंभीर जखमी

0

पारोळा- तालुक्यातील सावखेडा होळ गावाजवळील इंद्रदेव महाराज मठाजवळ नव्या चारचाकी महेंद्रा पीकअप बोलेरा वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार जागीच झाल्याची तर दुचाकीस्वारामागे बसलेला अन्य एक ईसम गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. अपघातानंतर चारचाकी चालक वाहन सोडून पसार झाला. या अपघातात मयत झालेल्या इसमाची रात्री उशिरापर्यंत ओळख पटलेली नव्हती. सूत्रांच्या माहितीनुसार दुचाकी (एम.एच.19 एक्स.7776) वरून दोन जण जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव महेंद्रा पीक अप बोलेरो वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला फेकले गेले. पारोळा पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच उपनिरीक्षक यशोदा कणसे, हवालदार प्रकाश चौधरी यांनी धाव घेतली. अपघातानंतर बोलेरा पीकअप चालक पसार झाला तर पोलिसांनी अपघातग्रस्त दोन्ही वाहने पारोळा पोलिसात आणली आहे. दरम्यान, मृतदेह पारोळा कुटीर रुग्णालयात हलवण्यात आला असून गंभीर जखमी झालेल्या इसमास उपचारार्थ एरंडोल येथे हलवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. रात्री उशिरा पोलिस पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.