पारोळ्यातील लाचखोर उपकोषाधिकारी धुळे एसीबीच्या जाळ्यात

0

पारोळा- जीपीएफ प्रकरणातील रक्कम तक्रारदार यास देण्यासाठी एक हजारांची लाच घेणारे पारोळा कोषागार विभागातील उपकोषाधिकारी शिवदास नाईक यांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. तक्रारदाराच्या माहितीनुसार खात्री करण्यासाठी धुळे एसीबी विभागाचे उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर यांच्यासह पथकाने सोमवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास सापळा रचून ही कारवाई केली.