पारोळ्यात अंबिका डेअरीतून 16 लाखांची रोकड लंपास

0
भुसावळ : पारोळा शहरातील अमळनेर-जळगाव रस्त्यावरील गोपाळ महाजन यांच्या मालकीची अंबिका डेअरीतून अज्ञात चोरट्याने 16 लाख 27 हजारांची रोकड लांबवल्याची घटना शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली.
चोरटा माहितगार असल्याचा संशय असून पोलिसांनी त्या दृष्टीने डेअरीतील कामगारांची चौकशी सुरू केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलीस उपअधीक्षक रफिक शेख, पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे यांनी अंबिका डेअरीला भेट देत माहिती जाणून घेतली. अज्ञात चोरट्याविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.