पारोळ्यात तीन दुचाकी चोर पोलिसांच्या जाळ्यात

0

पारोळा- शहरातील बालाजी मंदिर परीसरातून गुलाम शहा यांची दुचाकी चोरी झाली होती. त्यातील आरोपी बालाजी संस्थानच्या सीसीटीव्हीत दिसून आले. पोलिसांनी 24 तासांत तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सीसीटीव्ही फुटेजमधून पोलिसांनी आरोपींचा चेहरा ओळखला. पोलिस निरीक्षक विलास सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी सुनील साळुंखे, पंकज राठोड, नरेंद्र पाटील, मोहसीन खान, शशिकांत निकम यांंनी सापळा रचुन चोरीतली दुचाकीसह कासीम पिंजारी (रा. पारोळा), अखतर नसीम, दानेश शेख (दोघे रा. धुळे) यांना धुळे-चाळीसगाव चौफुली येथून पकडले.