पारोळ्यात बनावट डांबराचा कारखाना उद्ध्वस्त

0
चार लाखांचे साहित्य जप्त ; आरोपी पसार
पारोळा:- बनावट डांबराचा कारखाना सुरू असल्याची गुप्त माहिती पारोळा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक विलास सोनवणे यांच्या नेतृत्वात पथकाने टाकलेल्या छाप्यात चार लाख 9 हजार रुपये किंमतीचे बनावट डांबर बनविण्याचे साहित्य शनिवारी सायंकाळी जप्त करण्यात आले. आरोपी मात्र पसार होण्यात यशस्वी झाला. दिनेश पोपटराव पाटील यांच्या मालकिचा हा कारखाना असल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपीने गेल्या काही दिवसांपासून हा अनधिकृत कारखाना उघडून त्याद्वारे बनावट डांबराची विक्री करण्याचा उद्योग चालवल्याची माहिती सूत्रांनी दिली. चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा निरीक्षक विलास सोनवणे व त्यांच्या सहकार्‍यांनी ही कारवाई करीत साहित्य जप्त केले.