पारोळा : पिशवीत 21 हजारांची रोकड असल्याची संधी साधून ती ब्लेड मारून लांबवण्याच्या प्रयत्नातील दोघा महिलांना अटक करण्यात आली. मध्यप्रदेशातील दोघा महिलांविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने दोघा महिलांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
रोकड लांबवण्याच्या प्रयत्नात महिला जाळ्यात
शहरातील सेंट्रल बँकेसमोरील फळ विक्रेत्याच्या स्टॉलसमोर धर्मराज लोटन पाटील (68, रा.पारोळा) हे उभे होते. याप्रसंगी त्यांच्याकडील पिशवीत 21 हजारांची रोकड होती व या पिशवीला ब्लेडने कापून थैलीतील रोकड लांबवण्याचा प्रयत्न अंजली सिसोदिया (20) व रचना सिसोदिया (30, रा.कठीया, जि.राजगड, मध्य प्रदेश) या दोन महिलांनी केला मात्र हा प्रकार लक्षात आल्याने या दोन्ही महिलांना ताब्यात घेवून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दोघा महिलांविरूध्द पारोळा पोलिस स्थानकात कलम 379, 511, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.