पार्किंगमध्ये पार्क केलेल्या दोन दुचाकी पेटवल्या

0

चिखली : इमारतीच्या पार्किगमध्ये पार्क केलेल्या दोन दुचाकी अज्ञातांनी पेटवून दिल्या. यामध्ये दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी चिखली येथे घडली. विश्‍वंबर सोपानराव जगताप (वय 51, रा. चिखली) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगताप यांची दुचाकी नेहमीप्रमाणे इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. शनिवारी रात्री अज्ञातांनी जगताप यांची दुचाकी पेटवून दिली. धुराचे लोट पाहून पार्किंगमध्ये आग लागल्याचे जगताप यांना समजले. त्यांनी शेजार्‍यांच्या मदतीने आग विझवली. या आगीमध्ये जगताप यांच्या दुचाकीशेजारी पार्क केलेली आणखी एक दुचाकी जळून खाक झाली आहे. यावरून चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार गायकवाड करीत आहेत.