पार्किग केलेली तवेरा गाडी चोरीला

0
जळगाव – सर्विसिंग करून अंगणासमोर लावलेली तवेरा कार अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेल्याची घटना सकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, दिनकर हिरामण पाटील (वय-43) रा. अशोक नगर, गणपती नगर यांची मालकीची 2015 मध्‍ये तवेरा गाडी क्रमांक (एमएच 19 वाय 6159) ही 27 ऑगस्ट रोजी सर्व्हिसींग करून सायंकाळी घराच्या समोरील अंगणात पार्किग करून लावली. रात्री 11 वाजता घरातील सर्वजण झोपून गेले होते. दरम्यान रात्री 11 ते सकाळी 6 वाजेदरम्‍यान अज्ञात चोरट्यांनी अंगणात लावलेली तवेरा गाडी चोरून नेल्याचे लक्षात आले. दिनकर पाटील यांच्‍या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.