पार्कींग दंडाच्या रकमेवरही जीएसटीचा होतोय परिणाम

0

मुंबई । एखाद्या ठिकाणी बेकायदा वाहन पार्किंग केल्यास त्यांचा अधिक भुर्दंड भरण्याची तयारी आता वाहन मालकांनी ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. कारण बेकायदा पार्किंग करणारी वाहने उचलून नेणार्‍या टोईंग गाड्यांच्या भाड्यात जीएसटीची भर पडल्याने त्याचा परिणाम आता दंडाच्या रकमेवर झाली आहे. त्यामुळे आता बेकायदा पार्किंग करणार्‍या दुचाकी वाहन चालकाला 660 ऐवजी 672 रुपये, तर चारचाकी वाहन चालकाला 430 रुपयांऐवजी 436 रुपये दंड भरावे लागणार आहे.

टोईंगच्या आधुनिक गाड्यांमुळे वाढली दंडाची रक्कम
मुंबईत प्रत्येक महिन्यात सरासरी 30 हजार चारचाकी वाहने आणि 45 हजार दुचाकी वाहन चालकांना बेकायदा पार्किंग केल्याप्रकरणी दंड आकारण्यात आले आहेत. नवीन टोईंग व्हॅन आल्यापासून मागील वर्षापासून टोईंगची रक्कम वाढली आहे. ही वाढलेली रक्कम चारचाकी वाहनासाठी 200 रुपयांवरून 400 रुपये, तर दुचाकी वाहनासाठी 100 रुपयावरून 200 रुपये करण्यात आली आहे. याआधीच्या टाईंग व्हॅन एखादी वाहन उचलायचे असेल, तर पारंपरिक साधनांचा वापर करावा लागायचा जो वेळकाढूपणाचा होता, तसेच त्यामुळे वाहतूक कोंडीही व्हायची मात्र नवी टोईंग व्हॅन अत्याधुनिका साधनांनीयुक्त आहेत.