मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या चौकशी सुरु असतांना बॉलीवूडमधील ड्रग्स प्रकरणाचा खुलासा झाला आहे. दररोज नवनवीन अभिनेते, अभिनेत्री समोर येऊन ड्रग्सबाबत नवनवीन खुलासा करत आहेत. अभिनेत्री कंगना रानौतने ड्रगबाबत वक्तव्य केल्यानंतर चौकशी सुरु झाल्यानंतर आता अभिनेत्री दीपिका पदुकोनसह अनेकांचे नावे समोर आले आहे. दरम्यान अभिनेत्री शर्लिन चोप्राने धक्कादायक खुलासा केला आहे. पार्ट्यांमध्ये बॉलीवूड स्टार्स आणि क्रिकेटर्सच्या पत्नी ड्रग्स घेतात असे धक्कादायक विधान अभिनेत्री शर्लिन चोप्राने केला आहे. त्यामुळे आता बॉलीवूडमध्ये वेगळे वळण लागणार आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना शर्लिनने अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. शारीरिक शोषण केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
अभिनेता शाहरुख खान यांच्या कोलकाता नाईट रायडर या संघाच्या पार्टीत मी अनेक स्टार्स आणि क्रिकेटर्सच्या पत्नींना ड्रग्स घेतांना पहिले असल्याचे शर्लिनने सांगितले. शाहरुख खानही ड्रग्स घेतात का? याबाबत त्यांनी संदिग्ध उत्तर दिले.