पवार कुटुंबात सगळे काही ठिक असल्याचा संदेश?
पिंपरी- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्या मावळ मतदार संघातील उमेदवारीवरुन पवार कुटुंबात मतभेद निर्माण झाल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली होती. परंतु, प्रत्यक्षात शुक्रवारी पार्थ यांची उमेदवारी जाहीर होताच शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कौटुंबिक फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. यामध्ये रोहित पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे एकत्र दिसत आहेत. यातून पवार कुटुंबात सगळे काही आलबेल असल्याचा संदेश? देण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा रंगली आहे.
मावळमधून निवडणूक लढविण्यासाठी पार्थ पवार इच्छूक होते. परंतु, शरद पवार यांनी अगोदर त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. पवार कुटुंबातून मी एकटाच लढणार असल्याचे सांगितले होते. काही दिवसांनी नातू पार्थ यांच्यासाठी आपण निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, दुसरा नातू रोहित पवार यांनी शरद पवार यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णयाचा फेरविचार करावा, अशी फेसबुक पोस्ट केली होती. त्यावरुन पवार कुटुंबामध्ये पार्थ यांच्या उमेदवारीवरुन मतभेद निर्माण झाल्याची चर्चा रंगली होती. रोहित पवार आणि पार्थ पवार यांच्यात राजकीय संघर्ष सुरु झाल्याचे बोलले जाऊ लागले.
प्रत्यक्षात शुक्रवारी पार्थ यांची उमेदवारी जाहीर होताच शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कौटुंबिक फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. यामध्ये रोहित पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे एकत्र दिसत आहेत. यातून पवार कुटुंबात सगळे काही आलबेल असल्याचा संदेश? देण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा रंगली आहे.