पार्थडीच्या तापणे कुटूंबाची धुळ्यात रसवंती

0

धुळे । अहमदनगर जिल्ह्यातील पार्थडी गावातील तापणे कुटूंब सालाबादाप्रमाणे याही वर्षी धुळ्यात आपला उसाचा चरखा घेवून दाखल झाले आहेत. बैलाच्या सहाय्याने लाकडाच्या चरख्यातून ताज्या उसापासून निघणारा स्वादिष्ट रस पिण्यासाठी धुळेकरांची त्यांच्या रसवंतीवर नेहमीच गर्दी असते. नगर जिल्ह्यातील पार्थडी गावाचे सुरेश तापणे हे एक शेतकरी आहेत. उन्हाळ्यात शेतीतल्या विहीरीला पाणी नसल्यामुळे आपला संसाराचा गाडा चालवण्यासाठी गेल्या दहा वर्षापासून आपले कुटूंब व बैलांसोबत धुळ्यात जानेवारी महिन्यात दाखल होत असतात. धुळ्यातील एसआरपी पेट्रोलपंपासमोर आपले रसवंतीचे दूकान थाटून व्यवसाय करत असतात. उसाचा रस काढण्यासाठी त्यांनी एक लाकडाचा चरखा तयार केला आहे. सुरेश तापणे यांचे म्हणने आहे की लाकडाच्या चरख्यामुळे स्वादिष्ट व क्वॉलीटीचा रस लोकांना प्यायला मिळतो.

बैलानांही पूरक चारा मिळतो
अहमदनगर जिल्ह्यात पाऊस कमी जास्त प्रमाणात होतो. धुळे जिल्ह्यात पाण्याची कमतरता नसल्यामुळे गुरांना ओला चारा मिळत असल्याचे समाधान ते सुरेश तापणे व्यक्त करतात. कुटंबातील अकरा सदस्य आणि सहा बैल व चार पाच गुरं असा मोठा पसारा वागण्यासाठी तापणी कुटूंब तत्पर असते . त्यांच्या जोडीला मेहनत करतात ती त्यांची सरजा राजाची जोडी, म्हणजे त्यांची बैलं. परिवारातील दोन लोक बैलासांठी नेहमी चारा पाण्याची सोय करत असतात.कारण शेवटी बैलांवरच त्यांची दरमदार आहे.

रसवंतीचा व्यवसाय तेजीत
शहरात किमान रसवंतीचे 200 दुकाने आहेत. उन्हातान्हात पाण्याने व्याकुळते लोक आणि लग्नसराई असल्यामुळे लग्नातले वर्‍हाडी मंडळी उसाच्या रसावर येथेच्छ ताव मारतांना दिसतात. दोनशे दुकानापैकी लाकडाचा चरखा असलेले सुरेश तापणी यांची एकमेव रसवंती धुळ्यात आहे. त्यामुळे तापणी कुटूंब दररोज दोन ते तीन क्विंटल उस पिळून रसाची विक्री करतात. सकाळी दहा वाजेपासून लोकांची गर्दी होणे सुरू होते तर रात्रीचे दहा वाजेपर्यंत रसवंती सुरू राहते. काही ग्राहक पार्सल बांधून नेतात.

शितपेयांवर परिणाम
शितपेयांमुळे उद्भवणारे आजार तसेच शारीरीक नुकसान समजून लोकांनी हल्ली देशी विदेशी शितपेयांकडे दुलर्ष केल्याचे चित्र आहे. त्यामुळे उसाच्या रसवंत्या आणि लिंबू शरबतची अधिक मागणी होते असे काही रसवंतीचालक सांगतात. पन्नास रूपयाची शितपेयाची बॉटल घेण्यापेक्षा लोक दहा रूपयात उसाचा रस पिऊन समाधान मानतात. कडाक्याचे उन्हात लोक शितपेयांच्या दुकानांकडे न वळता उसाच्या रसवंत्या शोधतात.त्यामुळे शितपेयांच्या विक्रीवर चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून येते.