पार्वतीबाई तुपे मुलींच्या वसतीगृहाचा स्वागत समारंभ

0

हडपसर । वसतीगृहासारखे आनंदी जीवन असू शकत नाही. उद्दिष्टपासून दूर न जाता त्याचा आनंद घ्या. स्वतः नवीन गोष्टी शिका, शारीरिक फिटनेसबरोबर मानसिक क्षमता विकसित करा. कठीण परिस्थितीही सकारात्मक राहा. संसारपेक्षा वेगळे करण्याचे सामर्थ्य मुलींमध्ये असले पाहिजे, असा सल्ला सहाय्यक पोलीस आयुक्त वैशाली माने यांनी दिला. रयत शिक्षण संस्थेच्या एस.एम. जोशी कॉलेजमध्ये पार्वतीबाई दगडू तुपे मुलींचे वसतीगृहाचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. रमा तुपे, अशोक तुपे, प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले, उपप्राचार्य डॉ. अशोक धुमाळ, डॉ. प्रभंजन चव्हाण, डॉ. सरोज पांढरबळे, डॉ. अशोक धामणे, डॉ. हेमलता कारकर, प्रा. श्रद्धा कोद्रे, डॉ. एम. एल. डोंगरे, प्रा. बाळासाहेब देवकाते, डॉ. अशोक पांढरबळे, प्रा. एस. व्ही जडे आदी उपस्थित होते.

रमा तुपे म्हणाल्या, मुलींनी शिक्षणाबरोबर चांगले छंद जोपासावे. करमणुकीच्या साधनांमध्ये अडकून बसू नका, एकमेकांशी चांगला संवाद साधा, चांगले आरोग्य, व्यायाम, आवडी, जोपासा व आनंदी राहा, असे मार्दर्शन करून जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्व मुलींना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक डॉ. सुनंदा पिसाळ यांनी केले. सूत्रसंचलन डॉ. शकुंतला सावंत यांनी मानले व आभार डॉ. बेबी खिलारे यांनी मानले.