पार्श्‍वनाथ दिगंबर जैन विश्वशांती महायज्ञाला सुरुवात

0

वरणगाव : येथील श्री पार्श्‍वनाथ दिगंबर जैन मंडळातर्फे 6 ते 12 जानेवारी दरम्यान नूतन जिनबिंब पंचकल्याणक महाम विश्वशांती महायज्ञ महोत्सवाला सकाळी 9 वाजता वात्सल्य रत्नाकर मुनिश्री 108 स्वात्मनंदीजी महाराज यांच्या उपस्थित दिगंबर जैन समाजबांधवांनी गावातील प्रमुख मार्गाने बग्गी, घोडे, कलशधारी महिलांनी भव्य इंद्र मिरवणूक काढून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

सुवर्ण रथावरुन काढण्यात आली मिरवणूक
सदर कार्यकमात वात्सल्यरत्नाकर स्वात्मनंदि महाराज यांचे सानिध्य लाभले असून यांच्या उपस्थित चंद्रनगरीचा प्रारूप तयार करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे शुभारंभ दिपक रुणवाल तर आभिषेक इंद्रान कडू यांच्या हस्ते करण्यात आले. सुर्वणशोभा म्हणून कोमल कारंजकर यांनी संस्कार केले. त्यांच्या हातून येणार्‍या सर्व कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. सजीव व हत्तीवरून सूवर्ण रथावरून व घोड्यावरून बँडच्या तालात अशी भव्य मिरवणूक काढून गर्भ, जन्म, तप, ज्ञान व मोक्ष अशा पंचकल्याणव्दारे आयोजन करण्यात आले आहे.

समाजबांधवांचे लाभले सहकार्य
कार्यक्रमासाठी जैन मंडळाचे अध्यक्ष अनिल जैन, मधूकर कारंजकर, चंद्रशेखर अवतारे, सुधाकर कारंजकर, धर्मनाथ सैतवाल, विजय जैन, संजीव अवतारे, सुधिर कारंजकर, युवक मंडळाचे तेजस राजकुमार, संजय सैतवाल, राजू सैतवाल, संजय जैन, सुर्दशन जैन आदी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व समाजबांधव परिश्रम घेत आहे. या कार्यक्रमाची दिनचर्या 12 पर्यंत सुरु राहील.