कोल्हापूर । विधानसभा व महापालिका निवडणुकीत भाजप व शिवसेना यांच्यात संबंध दुरावले होते. आमदार राजेश क्षीरसागर यांनी भाजपच्या नेत्यावर आग ओखली होती. यापार्श्वभूमीवर जिल्ह्यात भाजप विरूध्द शिवसेना असे चित्र होते.मात्र पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष निवडीने दोन्ही पक्षातील दुरावा कमी होण्यास मदत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तसेच नेते आणि पक्षातील संबंध सुधारण्यास मदत होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सदस्यपदी भाजपाचे सुभाष वोरा व शिवसेनेचे शिवाजी जाधव यांची निवड झाली. अध्यक्षपदासाठी महेश जाधव तर कोषाध्यक्षपदी वैशाली क्षीरसागर यांचे नाव पुढे आले. यातून उशिरा का होईना या पदांची घोषणा झाली.
या निवडीने पालकमंत्री पाटील यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. क्षीरसागर यांच्या घरात पद देवून दोन्ही पक्षातील दुरावा कमी केला आहे. सध्या अंबाबाई मंदिराचा वाद चर्चेत आहे. देवस्थान समितीतील भ्रष्टाचारावर आमदार क्षीरसागर अधिक आक्रमक आहेत.