पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दैनिक ‘जनशक्ती’च्या बाप्पाची महाआरती

कोरोनाचे संकट लवकर टळु दे, सुखसमृध्दी लाभू दे - ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज दैनिक ‘जनशक्ती’च्या गणरायाची महाआरती करण्यात आली. यावेळी कोरोनाचे संकट टळुन सगळ्यांना निरोगी आरोग्य लाभू दे असे साकडेही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी गणरायाला घातले.
दैनिक ‘जनशक्ती’च्या जळगाव कार्यालयात शुक्रवारी गणरायाची विधीवत स्थापना करण्यात आली. स्थापनेच्या दुसर्‍याच दिवशी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दैनिक ‘जनशक्ती’च्या कार्यालयास सदीच्छा भेट दिली. अत्यंत व्यस्त कार्यक्रमातूनही वेळ काढत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भेट दिल्याने त्यांचे संपादक यतीनदादा ढाके यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. तसेच ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दैनिक ‘जनशक्ती’च्या बाप्पाची महाआरती करण्यात आली. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘गणपती बाप्पा मोरया’ गजर करण्यात आला. यावेळी ना. गुलाबराव पाटील यांनी बाप्पाचे पूजन करीत कोरोनाचे संकट लवकर टळू दे. राज्यातील बळीराजा आणि नागरिकांना सुखसमृध्दी लाभू दे असे
साकडेही ना. गुलाबराव पाटील यांनी गणरायाला घातले.
कुंदनदादांच्या आठवणींना उजाळा
महाआरती झाल्यानंतर ना. गुलाबराव पाटील यांनी संपादक यतीनदादा ढाके यांच्याशी चर्चा केली. यावेळी दैनिक ‘जनशक्ती’चे मुख्य संपादक स्व. कुंदनदादा यांच्या आठवणींनाही ना. पाटील यांनी उजाळा दिला. तसेच त्यांनी कार्यालयीन कामकाजाचाही आढावा घेतला.
यांची होती उपस्थिती
यावेळी माजी जिल्हा परिषद गटनेते विश्वनाथ पाटील, नवलसिंग पाटील, जनाआप्पा कोळी, मुकुंद नन्नवरे, दैनिक ‘जनशक्ती’चे व्यवस्थापक धन्यकुमार जैन, एस. आर. पाटील, वृत्तसंपादक अमित महाबळ, मुख्य उपसंपादक चेतन साखरे, यावल प्रतिनीधी पराग सराफ, संगणक विभागातील प्रवीण भन्साली, हेमंत अत्तरदे, धनंजय चव्हाण आदी उपस्थित होते.